English
भारतीय संस्कृती मधे गुळाला स्वयंपाकघरात अनन्य साधारण महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये गुळाचे अनेक औषधी उपयोग सांगितले आहेत. गुळामध्ये लोह व पोटॅशियमची मात्रा मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म चांगले आहेत.

सर्दी व कफ

  • सर्दी व कफ यासारख्या आजारावर गुळ उपयोगी आहे. साधारण चमचाभर गुळ व कोमट पाणी घेतल्याने सर्दी कमी होते.
  • १चमचा गुळ व १ चिमूट हळद एकत्र करुन त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून खाल्याने, कोरडी ढास कमी होते.
  • सर्दी झाली असल्यास गुळाचा चहा, तुळस. गवती चहा घालून घेतल्यास सर्दीपासून आराम मिळतो.
  • सुंठ + गुळ + तूप खाण्याने कफ –पित्तशमन होऊन भूक वाढते.

रक्ताचे आरोग्य

  • गुळ उष्ण आहे व शीघ्रवाही आहे. रक्ताभिसरण सुधारते.
  • गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून येते व रक्तक्षय टाळता येतो.
  • गुळाच्या नियमीत सेवनाने लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते.
  • योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते व रक्त शुध्दी होते.

त्वचा व केसांचे आरोग्य

  • केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज १ चमचा गुळ + १/२ चमचा काळेतीळ व वाळलेल्या खोबऱ्या चा तुकडा खावा. केसांची वाढ चांगली होते व केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
  • गुळाच्या रोजच्या सेवनाने त्वचा निरोगी, नितळ होते व चेहऱ्यावर पुरळ, मुरूमाचे फोड येण्याचे प्रमाण कमी होते. कारण गुळामध्ये जीवनसत्वे व खनिजे मुबलक प्रमाणात आहेत.

पचनक्रिया व पोटाचेआरोग्य

  • आंव झाली असल्यास गुळाचा खडा व गरम पाणी पिण्याने आंव कमी होते व पोटदुखी थांबते.
  • अमांश झाला असल्यास चमचाभर तूप आणि चमचाभर गुळ एकत्र शिजवून चाटण करुन घेतल्याने अमांश कमी होते.
  • गुळामध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे पचनक्रिया सुधारते व पचन सुधारल्यामुळे वजन आटोक्यात राह्ते.
  • हिवाळ्यामध्ये पचनक्रिया मंदावते ती सुधारण्यासाठी हिवाळ्यात आवर्जून गुळाचे आहारातील प्रमाण वाढवावे भूक लागण्यास मदत होते.
  • नविन गुळ हा पचनास जड व कफ पित्त वाढविणारा असतो म्हणून आहारात जुना गुळ वापरावा.

स्त्रियांचे आरोग्य

  • मासिक पाळीत ओटीपोट दुखत असल्यास गुळाचा खडा खाऊन वर पाणी प्यावे. पोट दुखी थांबते.
  • बाळंतिणीलागुळ + डिंक + खोबऱ्याचे लाडू दिल्यास दूध येते.
  • आळीव व गुळाने रक्तस्त्राव व्यवस्थित होऊन बाळंतिणीचा गर्भाशय स्वच्छ होऊन तो मूळ स्थितीत येतो.

रोगप्रतिकारशक्ती वर्धक व वजन नियंत्रण

  • शरीरामध्ये पाणी साठवण्याची सवय नियमित गुळाच्या सेवनाने कमी होते व वजन कमी होण्यास मदत होते.
  • ज्यांना अर्धशिशीचा त्रास होतो अशांनी १ चमचा साजूक तूप + १ चमचा गुळ नियमितपणे अनशापोटी घेतल्यास अर्धशिशी कमी होते.
  • गुळाच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ती वाढते.
  • १ चमचा गुळ व आल्याचा रस एकत्र करून खाल्यास सांधेदुखी कमी होते.

उर्जा व शक्ती वर्धक

  • साखरेने फक्त गोडवा मिळतो तर गुळाने शरीराला हळूहळू व दिर्घकाळा पर्यंत उर्जा मिळते.
  • गोड पदार्थ खाल्याने शरीराला उर्जा मिळते व रक्तप्रवाह सुधारतो व चित्त एकाग्र होण्यास मदत मिळते म्हणून रोज १ गुळाचाछोटा खडा खावा.
  • दुधात गुळ मिसळून घेतल्यास हाडांना बळकटी येते.
  • पायात पेटके येत असल्यास गुळाचा खडा खाऊन त्यावर पाणी प्यावे. स्नायूंमधील वेदना कमी होतात व स्नायू पूर्ववत काम करतात.
  • उन्हातून आल्यावर लगेच पाणी न पिता पाच मिनिटे थांबून थोडा गुळाचा खडा खाऊन पाणी प्यावे म्हणजे शरीराचे तापमान कायम राहून थकवा दूर होतो.
  • थंडीचे दिवसात गुळ खाण्याने शरीराचे तापमान कायम राहण्यास मदत होते. म्हणून संक्रातीला गुळपोळी तूप, आणि तिळगुळाच्या वड्या खाल्या जातात.
  • शिजवलेल्या कैरीच्या गरात गुळ + मीठ घालून पन्हे करून उन्हाळ्यात पिण्याने शरीराला थंडावा मिळतो.

अन्य आरोग्यदायी उपयोग

  • साजूक तुपाबरोबर गुळ खाल्यास उष्ण पडत नाही.
  • मूठभर शेंगदाणे + गुळ रोज खाण्याने प्रथिने व लोह भरपूर प्रमाणात मिळते व टि.बी. सारख्या आजारात प्रतिकार शक्ती वाढते.
  • शरीराला षड्रतसयुक्त आहार लागतो. गुळ पचायला हलका असल्यामुळे साखरेपेक्षा गुळ वापरण्याने मधुमेहाला प्रतिबंध होण्यास मदत होते व शरीराला हितावह व रुचकर होते.
  • शरीरातले मज्जासंस्थेचे कार्य चांगले होण्यासाठी गुळ + सुंठ + तूप वापरले जाते. खातात.
  • गालगुंड झाले असता गुळ + चुना एकत्र कालवून त्या जागेवर लेप देण्याने आराम मिळतो व व्याधी कमी होते.
  • तळपायाला काटा टोचून जखम झाली असल्यास गुळाचा खडा गरम करून चटका देतात. जंतूसंसर्ग होत नाही.
  • साखर घालून केलेल्या पुरणापेक्षा गुळ घालून केलेले पुरण पचण्यास हलके व चवीला खमंग होते.
  • पालेभाजी, आमटी, कायरस, पंचामृत इ. मध्ये साखरेपेक्षा गुळ घालण्याने पदार्थाला रूची येतेच व पदार्थांची पोषणमूल्ये वाढतात.
  • मुगाच्या व बेसनाच्या लाडवात साखरेऐवजी गुळ घालण्याने खमंग चव येते.